पिंपरी : अभिवादन फेरीतून जपल्या चापेकर बंधूच्या स्मृती | पुढारी

पिंपरी : अभिवादन फेरीतून जपल्या चापेकर बंधूच्या स्मृती

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : ढोल ताशांचा दणदणाट, मशाल मिरवणूक आणि 500 फुट तिरंगा, रँडचा वध देखावा सादर करत पदयात्रेतून शहरवासीयांमध्ये क्रांतीवीर चापेकर बंधूच्या स्मृतींना जागे केले. क्रांतीवीर चापेकर समितीतर्फे चिंचवड याठिकाणी सोमवारी (दि. 17) रोजी क्रांतीवीर चापेकर बंधू स्मृतीदिनामित्त भव्य अभिवादन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक फेरीमध्ये सहभागी झाले होते.

चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथून सायंकाळी अभिवादन फेरीस प्रारंभ झाला. याठिकाणाहून मनपा केशवनगर शाळज्ञ, मोरया गोसावी स्टेडियम, काकडे पार्क, श्री शिवाजी उदय मंडळ, प्रदीप स्वीटस, पावर हाऊस चौक, क्रांतीवीर चापेकर बंधू चौक, गांधी पेठ असे मार्गक्रमण करत क्रांतीवीर चापेकरवाडा याठिकाणी फेरीचा समारोप करण्यात आला.

मार्गामध्ये भव्य असा भारतमाता चित्ररथ तयार करण्यात आला होता. तसेच रँडचा वध यांचे चित्ररथ यांचा समावेश होता. मशाल मिरवणुक, मुलींचे ढोल – ताशा पथक व मर्दानी खेळ सादर करण्यात आले. हे खेळ पाहण्यास नागरिकांची गर्दी झाली होती. ज्या ज्या ठिकाणाहुन फेरी मार्गस्थ होत होती नागरिकांची त्या ठिकाणी गर्दी होत होती.

Back to top button