कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध | पुढारी

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. अर्ज माघारी घेण्याच्या आज (दि.१२) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा कारखाना पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसने निवडणूकीतुन माघारी घेतल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी सहकार मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कार्यक्षेत्रातील सभासदांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध पार पडली. यामुळे पुन्हा एकदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची वाटचाल सुरू राहणार आहे.

‘बिनविरोध’ झालेले नवनियुक्त संचालक मंडळ पुढीलप्रमाणे : कंसात गटाचे नाव

( इंदापूर ) भरत शहा, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे
(कालठण) हर्षवर्धन पाटील, हनुमंत जाधव, छगन भोंगळे
(शेळगाव) बाळासाहेब पाटील, राहुल जाधव,अंबादास शिंगाडे
(भिगवण) पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड
(पळसदेव) भूषण प्रकाश काळे, प्रवीण देवकर, रतन हरिश्चंद्र देवकर
महिला राखीव – शारदा कुबेर पवार, कांचन अशोक कदम
अनुसूचित जाती जमाती – केशव विनायक दुर्गे
इतर मागास प्रवर्ग – सतीश उद्धव व्यवहारे
भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग – हिरा शंकर पारेकर
“ब” वर्ग प्रतिनिधी – वसंत खंडु मोहोळकर

 

Back to top button