पुणे : शिरूर शहरात महात्मा फुले यांचा पुतळा उभारणार ; पालकमंत्र्यांची घोषणा

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
Published on
Updated on

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात महात्मा फुले यांच्या पुतळा उभारण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. धर्मेंद्र खांडरे, जिल्हा नियोजन समितीच सदस्य राहुल पाचर्णे, मुख्याधिकारी अ‍ॅड. प्रसाद बोरकर, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भालेराव, माया गायकवाड, प्रमोद गायकवाड, शरद गायकवाड, अविनाश शिंदे, रमेश गायकवाड, मनोज गाडेकर, नीलेश जाधव आदी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर यांनी पुढील अनेक वर्षँच्या विचार करून राज्यघटना लिहिली. परिणामी, स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरी कोणताही पेच देशासमोर उभा राहिला नाही, असेही पाटील म्हणाले. मागासवर्गीय बांधवांसाठी शहरात जागा उपलब्ध करून दिल्यावर गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले. या वेळी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीस विजेत्यांच्या सन्मान व बक्षीस वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते केला. प्रास्ताविकात जयंती समितीचे अध्यक्ष विनोद भालेराव यांनी आंबेडकर उद्यानाची सीमाभिंत बांधण्यासाठी एक कोटी 64 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. लहान मुलांसाठी बाल क्रीडांगण करण्याची मागणीही केली. राहुल पाचर्णे, धर्मेंद्र खांडरे, माया गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केली.

मुख्याधिकारी प्रसाद बोरकरांच्या कामाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक
मुख्याधिकारी अ‍ॅड. प्रसाद बोरकर यांचे विशेष कौतुक चंद्रकांत पाटील यांनी केले. बोरकर यांचा माझ्याशी पहिल्यांदाच परिचय झाला. माझ्या 45 वर्षांच्या राजकारणात माझे डोळे व कान हे खूप तीक्ष्ण असून, माझा अंदाज कधी चुकत नाही, असे ते म्हणाले. बोरकर हे अतिशय होतकरू व संवेदनशील मुख्याधिकारी शिरूरला मिळाल्याचे विशेष कौतुक केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news