पुणे : तक्रार मागे घेण्यासाठी आई-मुलीला धमकी | पुढारी

पुणे : तक्रार मागे घेण्यासाठी आई-मुलीला धमकी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तक्रार मागे घेण्यासाठी एकाने अल्पवयीन मुलीसह तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या अल्पवयीन मुलीला आरोपीने फूस लावून पळवून नेले होते. त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

गेल्या वर्षी त्याच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर आरोपीवर बलात्कार, अपहरण, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात होता. जामीन मिळवून तो नुकताच बाहेर आला होता. 12 एप्रिल रोजी तो अल्पवयीन मुलीच्या घरी गेला. त्या वेळी तिची आई घरात होती. मी कारागृहातून बाहेर पडलो आहे. मला कोणाची भीती नाही. तुम्ही पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार मागे घेतली नाही, तर दोघींना जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक साबळे तपास करीत आहेत.

Back to top button