

पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणार्यास पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 48 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भोसरी येथे ही कारवाई केली. परमेश्वर दयानंद माने (26, रा.भोसरी, मु. देवणी, लातूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. भोसरी परिसरात एकजण नागरिकांच्या जीवितीला धोका निर्माण करून घरगुती गॅसचा काळाबाजार करीत होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी भोसरी येथील भगवतवस्ती मधील लक्ष्मी गॅस इंटरप्रायजेस दुकानातून आरोपीला ताब्यात घेतले. दुकानाची तपासणी केली असता मोठ्या गॅसच्या टाकीतील गॅस लहान टाक्यांमध्ये भरून त्यांची विक्री करत होता. आरोपीकडून पोलिसांनी 10 घरगुती गॅसच्या टाक्या व 28 लहान टाक्या असा एकूण 38 गॅस टाक्या, 2 गॅस, विड्रॉल मशीन, एक वजन काटा एकूण 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल केला असून भोसरी पोलिस तपास करत आहेत. गुन्हे शाखा एकचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलिस अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, विशाल भोईर, मारुती जायभाय, स्वप्नील महाले यांनी ही कारवाई केली.