पुणे : तरुणाकडून उकळली अडीच लाखांची खंडणी

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाविद्यालयीन तरुणाला फेसबुकद्वारे ओळख झालेल्या एका मित्राने तुझ्याबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवर झालेले चॅट आई-वडिलांना दाखवतो, अशी धमकी देऊन तब्बल अडीच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एरंडवणा येथे राहणार्‍या एका 48 वर्षांच्या व्यावसायिकाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रीतेश सोंडकर नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑक्टोबर 2022 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. फिर्यादींना त्यांच्या मुलाने कोणा मुलीशी बोललेले देखील आवडत नव्हते. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हा प्रकार आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने हा प्रकार अनेक दिवस घरच्यांना सांगितला नव्हता.

फिर्यादी यांचा मार्केट यार्डमध्ये व्यवसाय आहे. त्यांना मार्च महिन्यात वार्षिक टॅक्स भरावयाचा असल्याने त्यांनी स्वत:चे व कुटुंबीयांच्या खात्यात झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली. त्यात त्यांच्या मुलाच्या खात्यातून गुगल पे द्वारे 1 लाख 52 हजार रुपये व प्रत्येकी 25 हजार, असे चार वेगवेगळ्या क्रमांकावर ट्रान्सफर झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत मुलाला विचारणा केली असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन विचारले असता, त्याने सर्व सांगितले.

फिर्यादी यांच्या मुलाला ऑक्टोबरमध्ये प्रीतेश सोंडकर नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याने ती स्वीकारल्यावर त्याला स्रेहल गुरव नावाने मेसेज येऊ लागले. त्याने प्रीतेश सोंडकर नावाची फेसबुकवरील रिक्वेस्ट माझीच असून, मी तुझा व्हॉट्सअ‍ॅप नंबर त्यावरूनच घेतला असून, आपण मित्र म्हणून बोलू, असे सांगितले. व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट सुरू झाल्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाने त्याला भेटण्याविषयी विचारले. तेव्हा त्याने मी फुकट भेटत नाही, त्यासाठी 1 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. मुलाने 1 हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्याने आतापर्यंत केलेले चॅट तुझ्या आई-वडील व फेसबुक फ्रेंडना पाठवतो, असे म्हणून धमकाऊ लागला. पैशांची मागणी करू लागला.

आपल्या वडिलांना मित्र वगैरे आवडत नसल्याचे मुलाला माहिती असल्याने त्याने भीतीपोटी घरी कळू नये म्हणून तो मुलगा सांगेल तसे पैसे देत गेला. त्याने एकूण 1 लाख 52 हजार रुपये पाठविले होते. त्यानंतर 7 फेब—ुवारी रोजी त्याला पुन्हा मेसेज आला. आता शेवटचे 1 लाख रुपये दे. मी पुन्हा तुला त्रास देणार नाही, असे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या भाचाच्या दुकानात काम करणार्‍या चौघांच्या नावावर प्रत्येकी 25 हजार रुपये पाठविले.

ते पैसे त्याने सांगितलेल्या नंबरवर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांनी मुलाच्या मोबाईलवरील तो नंबर बंद केला. त्यानंतर त्याने दुकानातील लोकांना त्याला पैसे पाठविण्यास सांगितले होते, त्यांना मेसेज येऊ लागले. फिर्यादीच्या मुलाला मला फोन करायला सांगा, नाही तर त्याच्या वडिलांना फोन करेन, असे सांगून धमकी देत असे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news