पुण्यातील मंचरला पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत ! एकाच दिवशी घेतला 11 जणांना चावा

पुण्यातील मंचरला पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत ! एकाच दिवशी घेतला 11 जणांना चावा

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

मंचर : पुढारी वृत्तसेवा : ऐन यात्रेच्या दिवशी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालत 11 जणांचा चावा घेतला. त्यात अनेक लहान मुलांचा समावेश आहे. यातील गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे पाठविण्यात आले. शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी ग्रामस्थांनी सदर कुत्र्यास ठार केले. त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यात्रेमुळे मंचर शहरात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच शुक्रवारी पहाटे तीन वाजल्यापासून काळ्या रंगाच्या पिसाळलेल्या कुत्र्याने समोर येईल त्याला चावा घेण्यास सुरुवात केली. सुलतानपूर रोड, बाजारपेठ, काजीपुरा या भागांत कुत्र्याने नऊ जणांना जखमी केले.

विठ्ठल गुंजाळ (वय 65) हे बाजारपेठ रस्त्याने चालले असताना कुत्र्याने त्यांच्या पोटाला चावा घेतला. सौरभ प्रमोद कडदेकर (वय 25) हा दुकानापुढे उभा असताना कुत्र्याने त्याच्या हाताला चावा घेतला. अंशुमन किरण गुंजाळ या पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडावर कुत्र्याने चावा घेतला असून, त्याला गंभीर जखम झाली. फैजल अब्बासआली कुमेरआली मीर (वय 4) हा देखील गंभीर जखमी झाला. अंशुमन व फैजल यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने पुणे येथे उपचारांसाठी पाठविण्यात आले.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

कुत्र्याने रिझवान शेख (वय 11), शहाणआली इमानअली मीर (वय 5), मीजत हक्क (वय 3), कृष्णा समाधान गांगुर्डे (वय 9) व इतर तिघांचा चावा घेतला. देवेंद्रशेठ शहा फाउंडेशनचे अध्यक्ष निळकंठ काळे यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात येऊन जखमींना मदत केली. शहरात मोकाट कुत्र्याची संख्या वाढली आहे. नगरपंचायतीने सदर कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या गार्गी विशाल काळे पाटील यांनी केली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचा मंचर नगरपंचायतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी काँग्रेसचे राजू इनामदार, अल्लूभाई इनामदार यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news