काळजी घ्या: राज्यात दीड महिन्यांत उष्माघाताचे 357 संशयित रुग्ण, सर्वाधिक रुग्ण नंदूरबारमध्ये

काळजी घ्या: राज्यात दीड महिन्यांत उष्माघाताचे 357 संशयित रुग्ण, सर्वाधिक रुग्ण नंदूरबारमध्ये

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

पुणे, पुढारी वृत्तसेवा: यंदा मार्च महिन्यापासूनच राज्यात उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. सरासरी तापमान 40 अंश सेल्शिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताच्या त्रासाची शक्यताही वाढली आहे. गेल्या 15 दिवसांत राज्यात उष्माघाताचे 356 संशयितांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. यामध्ये सर्वाधिक नागरिक नंदूरबार येथील आहेत. पुण्यात 2 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात 1 मार्च ते 31 जुलै दरम्यान उष्माघाताचे सर्वेक्षण केले जाते. यासंदर्भात जिल्हा नोडल अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा, महापालिका आणि नगरपालिकांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर उष्माघातामुळे मृत्यू झाल्यास अन्वेषण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

अतिजोखमीचे घटक :

  • 65 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणा-या व्यक्ती
  • 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुले
  • गर्भवती माता
  • मधुमेह, ह्रदयविकाराचे रुग्ण
  • अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणा-या व्यक्ती

कारणे :

  • उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
  • कारखान्यांच्या बॉयलर रुममध्ये काम करणे
  • काच कारखान्यातील कामे
  • घट्ट कपड्यांचा वापर
लक्षणे :
  • पुरळ/घामुळया
  • उष्णतेने स्नायूमध्ये पेटके येणे
  • पाय, घोटा आणि हातांना सूज
  • थकवा येणे
  • बेशुध्द होणे

प्रतिबंधात्मक उपाय :

  • वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे
  • उष्णता शोषूण घेणारे कपडे घालावेत
  • भरपूर पाणी प्यावे
  • उन्हात जाताना डोके, कान, नाक, डोळे यांचे संरक्षण करावे.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_title" view="list" /]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news