पिंपरी: आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

पिंपरी: आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

पिंपरी (पुणे) : महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागातील मुख्य आरोग्य निरीक्षकाचे आठ महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. आयुक्त शेखर सिंह यांनी वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही.

कामावर हजर नसल्याने मुख्य आरोग्य निरीक्षक सुनील वाटाडे यांचे वेतन राखून ठेवण्यात आले होते. वाटाडे हे प्रत्यक्षात कामावर रूजू होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून त्याचे वेतन राखून ठेवले आहे. तक्रार निवारण दिवशी वाटाडे यांनी आयुक्त सिंह यांच्याकडे तक्रार मांडली होती. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी हजर दिवसांचे वेतन देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशावर प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप केली गेलेली नाही. त्या संदर्भात वाटाडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वेतन देण्याची कार्यवाही सुरू

फ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक सुनील वाटाडे यांची प्रशासनाने खातेनिहाय चौकशी केली. चौकशीला स्थगिती देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागास कळविले आहे. त्यांचे चार महिन्यांचे वेतन अदा केले आहे, असे फ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news