डॉ. आंबेडकर यांचे साहित्य आता ऑडिओ अन् ई-बुक्स स्वरुपातही

डॉ. आंबेडकर यांचे साहित्य आता ऑडिओ अन् ई-बुक्स स्वरुपातही

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याची भुरळ आजही कायम असून, त्यांची विविध भाषणे, त्यांनी लिहिलेले लेख, ग्रंथ अन् त्यांच्यावर लिहिण्यात आलेले चरित्र ग्रंथ हे आता ऑडिओ बुक आणि ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासकरुन विविध लेखांवर आधारित ऑडिओ बुकला तरुणाईची पसंती मिळत आहे.  विविध संकेतस्थळे, मोबाईल अ‍ॅपवर हे ऑडिओ बुक आणि ई-बुक उपलब्ध आहेत. नव्या माध्यमातही डॉ. आंबेडकर यांचे साहित्य वाचकांच्या पसंतीस उतरत आहेत.

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची 1920 ते 1956 या काळातील भाषणे, त्यांच्यावर विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके, डॉ. आंबेडकर यांचे चरित्र ग्रंथ, डॉ. आंबेडकर यांनी विविध विषयांवर लिहिलेली लेख आणि भारतीय राज्यघटना असे सारेकाही आता ऑडिओ बुक आणि ई-बुक स्वरुपात उपलब्ध असून, त्याला तरुण वाचकांचा त्याला प्रतिसाद आहे.

ऑडिओ बुक संस्थेच्या रश्मी नायगावकर म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 21 महत्त्वाची भाषणे आणि निवडक लेख हे आडिओ बुक स्वरुपात आम्ही आणले आहेत. 1920 ते 1956 या काळात महत्त्वाची 21 भाषणे  ऑडिओ बुक स्वरुपात आणली आहेत.  त्यासोबतच डॉ. आंबेडकर यांचे चरित्रही ऑडिओ बुकमध्ये आणले आहे. भारतीय राज्यघटनाही ऑडिओ स्वरुपात उपलब्ध असून, ऑडिओ बुक चांगला प्रतिसाद आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news