दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी यांची उलटतपासणी | पुढारी

दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी यांची उलटतपासणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सीबीआयचे तत्कालीन तपास अधिकारी एस. आर. सिंग यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यात बुधवारी उलटतपासणी पार पडली. हत्या झालेल्या दिवशीचा घटनाक्रम त्यांनी मांडला.
घटना घडल्यापासून गुन्ह्याचा तपास कसा केला? या खटल्याची 20 एप्रिलपर्यंत दररोज सुनावणी होणार आहे. फॉरेन्सिक टेस्ट, गौरी लंकेश प्रकरणात शरद कळसकर यांचा जबाब घेण्यात आला होता. त्यात असलेले मुद्दे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्यासह अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशा पाच आरोपींवर आरोप निश्चिती झाली आहे. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर आणि अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणी घेतली.

सीबीआयने ज्या कागदपत्रांच्या आधारे आपली बाजू मांडली ती कागदपत्रे उशिरा आम्हाला देण्यात आली. ते देण्यात आले तेव्हा कागदपत्रे फाटलेल्या अवस्थेत होते, असे मुद्दे मांडत बचाव पक्षाकडून उलटतपासणी घेण्यात आली. खटल्याचा अनुषंगाने कोणते पुरावे दाखल केले. त्यानंतर दोषारोपपत्रातील माहिती त्यांनी न्यायालयास दिली. सर्व कामे सोडून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मजकूर असलेला मेल हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित एका व्यक्तीकडून डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला पाठविण्यात आला होता. हा मेल हाती लागल्यानंतर त्याच दिवशी डॉ. तावडे याला अटक करण्यात आली, अशी साक्ष सिंग यांनी दिली.

Back to top button