पुणे : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल; पीएमपीच्या बसमार्गांतही बदल
पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. तसेच, पीएमपीच्या बसमार्गांतही बदल केले आहेत. वाहतूक पोलिस प्रशासनाने शहरात येणार्या नागरिकांची गर्दी लक्षात घेत, जिल्हाधिकारी परिसर, अरोरा टॉवर परिसर, विश्रांतवाडी चौक, दांडेकर पूल (सिंहगड रस्ता) या ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बदल…
- शाहीर अमर शेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली असून, ही वाहतूक आरटीओ चौकातून जहांगीर रुग्णालयाकडे जाईल.
- जीपीओ चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक, नेहरू मेमोरिअल चौक मार्गे जाईल.
- पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकात जाणारी वाहतूक अलंकार मार्गे वळविण्यात आली आहे.
- नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकात जाणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेस मार्गे वळविण्यात आली आहे.
- बॅनर्जी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पॉवर हाऊस चौकातून नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू रुग्णालय, पवळे चौक, कुंभारवेस मार्गे वळविण्यात आली आहे.
अरोरा टॉवर परिसर
प डॉ. कोयाजी रोड /तीन तोफा चौक :- डॉ. कोयाजी रोडवरून (सिल्हर ज्युबिली मोटर्स) नेहरु चौकाकडे जाणारी वाहतूक एस.बी.आय. हाऊस चौक मार्गे वळविण्यात आली आहे.
प इस्कॉन मंदिर चौक इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक इस्कॉन मंदिर चौकातून वळविण्यात येत आहे.
पार्किंग व्यवस्था…
- मालधक्का चौक ते बोल्हाई चौक, पुणे स्टेशन, बोल्हाई चौक ते साधु वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जी.पी.ओ. बोल्हाई चौक ते नरपतगीर चौक, फोटोझिंको प्रेस रस्ता व बोल्हाई चौक ते डॉ. बॅनर्जी चौक या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेखेरीज सर्व प्रकारची वाहनांना पार्किंग करण्यास मनाई केली गेली आहे.
- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करावयास येणार्या भाविकांच्या वाहनांकरिता आर. टी. ओ.शेजारी एस. एस. पी. एम. एस. मैदान (दुचाकी व चारचाकी वाहने). पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी व चारचाकी वाहने) व ससून कॉलनी येथे (दुचाकी वाहने) अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

