पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे विभागातील उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या
पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुणे विभागातील उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्यांचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथील उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सहा अधिकार्‍यांचा समावेश आहे.
सांगलीतील मिरज येथील उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलावडे यांची सहाय्यक आयुक्त (मावक) पुणे, सातारा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांची उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले विजयसिंह पाटील यांची सांगली निवासी उपजिल्हाधिकारी, संतोष कुमार देशमुख यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन सोलापूर येथे नियुक्ती करण्यात आली. गीतांजली शिर्के यांना उप जिल्हाधिकारी पुणे, नागरी समूह याच पदावर एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली.
दरम्यान पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरणाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक देशमुख यांची नोंदणी उपमहानिरीक्षक, संगणक, पुणे या पदावर तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news