पुणे : शस्त्राच्या धाकाने लुटणारा दोन साथीदारांसह जेरबंद | पुढारी

पुणे : शस्त्राच्या धाकाने लुटणारा दोन साथीदारांसह जेरबंद

 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोयत्याच्या धाकाने लुटणार्‍याला खडकी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या अल्पवयीन साथीदारांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. सागर सनी गुप्ता (वय 24, रा. जुना म्हाडा कॉलनी, हडपसर, सुरक्षानगर) असे त्याचे नाव आहे. तर, त्याच्या दोन साथीदारांसह तिघांच्या विरुद्ध पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना सोमवारी (दि.10) रात्री दोन वाजताच्या सुमारास शॉपर्स स्टॉपजवळ वाकडेवाडी परिसरात घडली आहे. याबाबत किरण कारभारी शेजवळ (वय 35, रा. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मगदूम करीत आहेत.

Back to top button