सातकरस्थळ येथे बिबट्यासाठी लावला पिंजरा | पुढारी

सातकरस्थळ येथे बिबट्यासाठी लावला पिंजरा

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा :  राजगुरूनगर नजीकच्या सातकरस्थळ पश्चिम येथील शेतकरी दत्तात्रय भानुदास सातकर यांच्या मक्याच्या शेतात वारंवार बिबट्या निदर्शनास आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने सोमवारी (दि. १०) सायंकाळी पिंजरा लावला.  परिसरातील अनेक नागरिकांचे पाळीव कुत्रे गेल्या आठवड्यात गायब झाली आहेत.
त्या पार्श्वभूमीवर नागरिक बिबट्या असल्याचे अंदाज व्यक्त करीत होते. अशातच रविवारी (दि ९) दुपारी दत्तात्रय सातकर यांच्या दोन एकर मका असलेल्या शेतात बिबट्या दिसला. जमलेल्या अनेक नागरिकांनी आरडाओरडा करीत त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. फटाके फोडण्यात आले; मात्र अडीच तासाने बिबट्या बाहेर पडल्याचे नागरिकांनी पाहिले.
नागरिकांच्या जीविताला धोका नको म्हणून वनविभागाकडे तक्रार नोंदवली. वनविभागाने खातरजमा करून सोमवारी सायंकाळी पिंजरा लावला. त्यात शेळी आणि वासरू ठेवण्यात आले आहे. परीसरातील तिन्हेवाडी, कोहिणकरवाडी गावातही पाळीव कुत्री गायब होण्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्या की बिबट्या सदृश्य इतर प्राणी याबाबत चर्चा सुरू आहेत.

Back to top button