अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार उदासीन | पुढारी

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार उदासीन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समाजातील पारंपरिक, आदिवासी आणि दुर्मिळ हस्तकला व त्यांच्या व्यवसायांना राजमान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहोत. महिलांनी शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन विकासाचे भागीदार बनावे, असे मत पारंपरिक हातमाग कारागीर डॉ. रुमा देवी यांनी व्यक्त केले. राजस्थानातील बाडमेरमध्ये ग्रामीण विकास व चेतना संस्थेच्या माध्यमातून डॉ. रुमा देवी यांनी 30 हजार महिलांना स्वयंपपूर्ण बनवले आहे.

या सामाजिक व महिलांचा आत्मविश्वास वाढवणार्‍या कार्याबद्दल सूर्यदत्त संस्थेच्या वतीने डॉ. रुमा देवी यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ’सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी कार्यकारी संचालक अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया, प्राचार्य वंदना पांडे आदी उपस्थित होते.

डॉ. रुमा देवी म्हणाल्या, ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कारा’ने महाराष्ट्रामध्ये झालेला हा सन्मान माझ्यासाठी विशेष आहे. सूर्यदत्त संस्थेने माझ्या कार्याची दखल घेतली याचा आनंद आहे. खरे तर हा सन्मान त्या सर्व महिलांचा आहे ज्यांचे मी प्रतिनिधित्व करत आहे.’ प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, ‘थरच्या वाळवंटातील पहिल्या महिला कारागीर असलेल्या डॉ. रुमा देवी यांचे कार्य खूप मोलाचे आहे. सर्व अडथळे, अडचणी पार करून त्यांनी ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर केले आहे. ’सूर्यदत्त’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करताना विशेष आनंद होत आहे.’

Back to top button