पुणे : भारतीय लाटेत उच्च शिक्षणाची महत्त्वाची भूमिका | पुढारी

पुणे : भारतीय लाटेत उच्च शिक्षणाची महत्त्वाची भूमिका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जागतिक पातळीवरील भारतीय लाटेत उच्च शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये यासाठी मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक धोरणात होत असणार्‍या बदलांच्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे उपस्थित होते.

भारत 41व्या स्थानावर
मनीष जोशी यांनी भारत जागतिक पातळीवर स्टार्टअप, संशोधन, इनोव्हेशनमध्ये कुठे आहे याची माहिती दिली. गेल्या काही वर्षांत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 81 व्या स्थानावरून 41 व्या स्थानावर आला आहे, असे अनेक दाखले त्यांनी दिले.

 

 

 

Back to top button