पानशेत धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू

पानशेत धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू
Published on
Updated on

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पानशेत -शिरकोली रस्त्यावरील वरघड (ता.वेल्हे) येथे पानशेत धरणात उतरून खोल पाण्यात फोटो काढताना पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. मोहीत हेमंत सराफ (वय 30, सध्या रा .बाणेर, पुणे. मूळ रा.सागर, मध्य प्रदेश) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. तो पुण्यातील कंपनीत संगणक अभियंता होता. शुक्रवारी (दि.7) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

पानशेत -वरसगाव धरण भागातील हॉटेल, रिसॉर्टमध्ये बेकायदेशीर पार्ट्यांचा हैदोस सुरू आहे. वरघड येथील आर्यावत रिसॉर्टमध्ये मोहित सराफसह कंपनीचे 29 जण कॅम्पिंगसाठी आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास मोहीत व त्याचे मित्र निखील बडगुजर, अनशुल अमेठा, वृषाली रगायधने, हरविंदरजित सिंग, शबनम सिध्दीकी, मानसी अगरवाल हे पानशेत धरण पाहण्यासाठी गेले. सर्व जण गुडघ्याभर पाण्यात उतरले. त्या वेळी मोहीत पाय घसरून पाण्यात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी मित्र पुढे धावले. साखळी करून मोहीतला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मित्रांसमोरच खोल पाण्यात बुडून मोहीत बेपत्ता झाला. कोणालाही पोहता येत नसल्याने सारे घाबरून बाहेर धावले.

माहिती मिळाल्यानंतर वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंधारामुळे रात्री धरणात शोधमोहीम राबविण्यात अडचणी आल्या. शनिवारी (दि.8) सकाळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकाने 14 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन करून मोहीतचा मृतदेह 16 फूट खोल पाण्यातून बाहेर काढला. या प्रकरणी वेल्हेचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, राजाराम होले, हवालदार पंकज मोघे तपास करत आहेत. मोहीत सराफ हा फोटो काढत असताना खोल पाण्यात पाय घसरून पडला. पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचे हवालदार पंकज मोघे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news