भोसरी : क्रीडा संकुलातील पाण्याच्या गळतीची दुरुस्ती | पुढारी

भोसरी : क्रीडा संकुलातील पाण्याच्या गळतीची दुरुस्ती

भोसरी : भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील पाण्याच्या पाइपची अखेर दुरुस्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करून पाणी गळती बंद केली आहे. सरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील पाण्याची पाइपलाइन फुटली होती. त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. महापालिकेच्या हलगर्जीपणाचा फटका खेळाडूंना सोसावा लागत होता.

परिसरात असलेली पाणीपुरवठा लाईन फुटल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात होते. तसेच, खेळाडूंनादेखील अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता. परिसरात पाणी साठून राहत असल्याने खेळाडूंना आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. परिणामी पाइपलाइनची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली जात होती. सध्या पाइपलाइनची दुरुस्ती केल्यामुळे खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button