पुणे: मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू | पुढारी

पुणे: मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 2 एप्रिलला संध्याकाळी सहाच्या सुमारास डेक्कन परिसरातील आठवले चौकातून लॉ कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. सौमित्र उदयराव भावठाणकर (वय 34 रा. कोथरुड ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वडील उदयराव भावठाणकर (वय 69) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौमित्र हा 2 एप्रिलला दुचाकीवरुन कोथरुडला निघाला होता. त्यावेळी लॉ कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात मोटार चालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सौमित्रला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक कवटीकवार तपास करीत आहेत.

Back to top button