इलेक्शनला उभे राहू नका अन्यथा !… काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी | पुढारी

इलेक्शनला उभे राहू नका अन्यथा !... काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातील काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ‘इलेक्शनला उभे राहू नका, अन्यथा गोळ्या घालून मारू’ अशी व्हाट्सअप कॉल वरून धमकी देण्यात आली आहे. या फोन कॉलनंतर समर्थ पोलीस स्टेशन मध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यात गेले काही दिवसांपासून राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना धमकी देण्याचे किंवा त्यांच्या नावे खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप नेते गणेश बिडकर नंतर काँग्रेसच्या नगरसेवक बागवे यांनाही धमकी मिळाली आहे.  अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे सुपुत्र आहेत.

Back to top button