राज्यात तीन महिन्यांत स्वाइन फ्लूचे 469 रुग्ण

राज्यात तीन महिन्यांत स्वाइन फ्लूचे 469 रुग्ण

पुणे : राज्यात कोरोना, 'एच3एन2'चे रुग्ण वाढत असताना स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले आहे. यंदा 1 जानेवारी ते 2 एप्रिल या तीन महिन्यांच्या कालावधीत स्वाइन फ्लूच्या 469 रुग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांनी ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया अशी लक्षणे अंगावर काढू नयेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राज्यात इन्फ्लूएन्झा विषाणूच्या उपप्रकारांचा संसर्ग वाढताना दिसत आहे. तीन महिन्यांमध्ये 3 लाख 70 हजार 546 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 2089 संशयित फ्लू रुग्णांना ऑसेलटॅमीवीरचा डोस देण्यात आला. यापैकी 469 रुग्ण 'एच1एन1' अर्थात स्वाइन फ्लूचे, तर 'एच3एन2'च्या 375 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या 112 रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. 'एच1एन1'ने 3 मृत्यू, तर 'एच3एन2'ने 5 मृत्यू झाले आहेत.

उपाययोजना
फ्लूसदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण
रुग्णांवर विनाविलंब उपचार
खासगी रुग्णालयांना स्वाइन फ्लू उपचारांची मान्यता
ऑसेलटॅमीवीर आणि इतर साधनसामग्रीचा पुरेसा पुरवठा
गर्भवती महिला, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणारे रुग्ण, कमी प्रतिकारशक्ती असणार्‍या व्यक्ती, आरोग्य कर्मचार्‍यांना फ्लू प्रतिबंधक लसीकरण.
सर्व खासगी औषध दुकानांमध्ये औषधे उपलब्ध ठेवण्यासाठी आंतरविभागीय समन्वय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news