पिंपरी : महाविद्यालयात ‘मिशन सबमिशन’

पिंपरी : महाविद्यालयात ‘मिशन सबमिशन’
Published on
Updated on

वर्षा कांबळे : 

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  वर्षभर 'कॉलेज लाईफ'चा मनमुराद आनंद घेत लेक्चर्स बंक करणार्‍यांना सध्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी चांगलाच घाम फुटत आहे. हा घाम काही उन्हाच्या तडाख्यामुळे नाही, तर सबमिशनच्या टेन्शनमुळे येत आहे. वर्षाच्या शेवटच्या सत्रातील परीक्षेपूर्वीचे विद्यार्थ्यांचे मिशन सबमिशन आता सुरू झाले आहे.

वर्षभरातील दंगा -मस्ती, खेळ मनोरंजन सगळे आता बस् झाले. आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेध लागले आहेत ते मे महिन्यामध्ये सुरू होणार्‍या परीक्षांचा अभ्यास पूर्ण करण्याचे. त्यासाठी दिवसरात्र एक करून लिहिलेल्या सबमिशनची यादी ही काही संपता संपत नाही. यामध्येच ऐन परीक्षांच्या काळातच क्रिकेट सामने असल्यामुळे क्रिकेटप्रेमींची द्विधा मन:स्थिती झाली आहे. एरव्ही मैदानात, उपहारगृहात, पार्किंगमध्ये टाईमपास करणारी मंडळी आता अभ्यासात गुंग झाली आहेत. भरपूर असाईनमेंट्स, प्रोजेक्ट, रिपोर्ट्स यासाठी दिवस अन रात्र लिखाण काम करताना दिसत आहेत. सबमिशन पूर्ण केले नाही तर लेट मार्क मिळेल, या भीतीने विद्यार्थी सबमिशनच्या कामात व्यस्त आहेत.

चांगले गुण मिळविण्याची धडपड
लेखी परीक्षेपेक्षाही अधिक टेन्शन विद्यार्थ्यांना असते, ते प्रत्येक विषयाच्या सबमिशनचे. फाईल्स, जर्नल्स, असाइनमेंट लिहिणे अशा गोष्टीतून अंतर्गत मूल्यमापना दरम्यान चांगले गुण मिळण्यासाठी सर्वच मुलांना या अग्नी दिव्यातून जावे लागते. वर्षभर निवांत असलेले विद्यार्थी याच काळात खडबडून जागे होतात आणि मग अपूर्ण राहिलेले सर्व काम कमी वेळात पूर्ण करून दाखवण्यासाठी धडपड सुरू होते.

क्रिकेट सामन्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास
अभ्यासही झाला पाहिजे आणि मनोरंजनही यासाठी क्रिकेट सामन्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे ठरवून अभ्यास करणे विद्यार्थी अधिक पसंत करत आहेत. दिवसभर कॉलेजमधील लायब—रीमध्ये अभ्यास करण्यात वेळ घालविला जातो. मग, संध्याकाळी मोबाईल किंवा टीव्हीसमोर बसून स्कोअर बघण्यात घालवला जातो. अभ्यास आणि सबमिशनची घाई मध्येच स्कोअर किती झाला याची उत्सुकता आहेच.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news