या हल्ल्यात बाळू घुले यांच्या डाव्या कानाचा अर्धा भाग तुटला आहे. त्यामुळे पारगाव, ढोबळे मळा या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. वनविभागाने ढोबळे मळा परिसरात त्वरित पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. वनविभागाने बढेकर-ढोबळे मळ्यातील संदिप कचरदास बढेकर पिंजरा लावला. या पिंजऱ्यात बिबट्या मंगळवारी (दि. ४) पहाटे जेरबंद झाला. बाळू घुले या मेंढपाळावर हल्ला केलेला हाच बिबट्या असावा, असा अंदाज ग्रामस्थ वनविभागाने व्यक्त केला आहे.