पुण्यात समाजकल्याण विभागाकडून ग्राम अभ्यासिका सुरू | पुढारी

पुण्यात समाजकल्याण विभागाकडून ग्राम अभ्यासिका सुरू

 नरेंद्र साठे

पुणे : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ग्रामीण भागातील मुलांसाठी शाहू, फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींचा स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढविणे, हा मुख्य उद्देश आहे.

नियंत्रण व देखरेख समिती
ग्राम अभ्यासिकांमध्ये मागासवर्गीय युवक व युवतींना नाममात्र दराने प्रवेश दिला जाणार आहे. नियंत्रण व देखरेखीसाठी जिल्हा, तालुकापातळीवर संनियंत्रण समित्या; तर गावपातळीवर युवक कार्यकारी समित्यांची स्थापना करण्यात येणार आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या प्रवर्गातील युवक-युवतींना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे.

अशी असणार समिती

जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती ही सामाजिक न्याय विभागाची विषय समिती असणार आहे. तालुका संनियंत्रण समितीचे अध्यक्ष हे संबंधित पंचायत समितीचे सभापती असणार आहेत. संबंधित गावातील युवकांमधून युवा कार्यकारी समिती निवडली जाणार आहेत. या युवा कार्यकारी समितीच्या माध्यमातून अभ्याससत्र, चर्चासत्राचे नियोजन, संवाद कार्यक्रम, सराव परीक्षा, सहभाग वाढविणे आणि कार्यशाळांचे आयोजन करणे आदींसाठी प्रत्येकी एका सदस्याची युवकांमधून निवड केली जाणार आहे.

अभ्यासिका प्रवेशासाठीची पात्रता व निकष

  • मागासवर्गीय विद्यार्थ्याने जातीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य
  •  प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी किमान 12 वी उत्तीर्ण असावा
  • इच्छुक विद्यार्थी संबंधित तालुक्यातील असणे आवश्यक
  • विद्यार्थ्याचे वय हे 18 ते 43 दरम्यान असावे
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश
  • खुल्या गटातील विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र

Back to top button