पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात नवीन 80 वाहने | पुढारी

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात नवीन 80 वाहने

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कचरा संकलनासाठी नवीन 80 वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांचे लोकार्पण पालकंमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, उपायुक्त आशा राऊत, महेश डोईफोडे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, कार्यकारी अभियंता गणेश उगले, कनिष्ठ अभियंता आशिष कोळगे आदी उपस्थित होते.

महापालिकेकडून ओला व सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहनांचा उपयोग करण्यात येतो. या कामासाठी 108 लहान वाहने, 93 ओला कचरा संकलक वाहने आणि सुक्या कचर्‍यासाठी 56 कॉम्पॅक्टर अशी एकूण 257 वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहेत. त्यापैकी 80 वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. उर्वरित वाहने महिन्याभरात सेवेत दाखल होतील.

या वाहनांवर जीपीएस आणि आरएफआयडी यंत्रणा बसविण्यात आल्याने कामांची नोंद महापालिकेतील नियंत्रण कक्षाद्वारे घेण्यात येणार आहे. या वाहनांवर 7 वर्षांसाठी सुमारे 325 कोटी खर्च होणार आहे. सर्व वाहने बीएस-6 प्रदूषण मानांकनाची असून त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

Back to top button