पुणे जिल्ह्यातील 9 कारखान्यांना सव्वासात कोटींचे व्याज अनुदान | पुढारी

पुणे जिल्ह्यातील 9 कारखान्यांना सव्वासात कोटींचे व्याज अनुदान

पुणे : राज्यातील 2017-18 ते 2020-21 या चार वर्षांचा गाळप हंगाम घेतलेल्या साखर कारखान्यांस ऊस पुरविणार्‍या शेतकर्‍यांच्या एफआरपीची रक्कम देण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जावर 71 कारखान्यांना 51 कोटी 44 लाख 75 हजार रुपयांइतके व्याज अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 9 सहकारी साखर कारखान्यांना 7 कोटी 26 लाख 41 हजार रुपयांचे व्याज अनुदान मंजूर झाले आहे.

अर्थ संचालकांंनी साखर आयुक्तालयातील लेखा-धिकार्‍यांमार्फत त्या-त्या साखर कारखान्यांच्या बँकेला व्याज अनुदानाबाबत देण्यात आलेल्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या आणि शासन आदेशानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाने
दिल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील कारखाने आणि रक्कम (रुपये)
माळेगाव सहकारी, बारामती – 1 कोटी 21 लाख 44 हजार
सोमेश्वर सहकारी, बारामती – 1 कोटी 4 लाख 18 हजार
श्री विघ्नहर सहकारी, जुन्नर – 1 कोटी 55 लाख 45 हजार
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी, इंदापूर – 50 लाख 22 हजार
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी, इंदापूर – 33 लाख 17 हजार
रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी, शिरूर – 33 लाख 3 हजार
संत तुकाराम सहकारी, मुळशी – 77 लाख 30 हजार
भीमाशंकर सहकारी, आंबेगाव – 91 लाख 87 हजार
छत्रपती सहकारी, इंदापूर – 38 लाख 41 हजार
निरा भीमा सहकारी, इंदापूर – 21 लाख 34 हजार

Back to top button