न्हावरे : कांद्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या; बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल | पुढारी

न्हावरे : कांद्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या; बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल

न्हावरे (ता. शिरूर; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍याने कांदा पिकाला रास्त बाजारभाव मिळत नसल्याने भर पिकात मेंढ्या सोडल्या आहेत. विलास यादव यांनी नाइलाजाने हा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत कांदा पिकाचे बाजारभाव खूपच पडले आहेत. एकरी कांदा पिकाला जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा सध्या कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त आहेत.

बदलते हवामान व अवकाळी पाऊस, यामुळे उत्पादनासाठी जास्त खर्च आला आहे. मात्र, तरीही शेतकर्‍याला उत्पादन खर्च वजा जाऊन अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कांदा उत्पादक हतबल झाले आहेत. त्यामुळेच यादव यांनी नाइलाजाने आपल्या शेतातील कांदा पिकात मेंढ्या चरण्यास सोडल्याचे सांगितले.

Back to top button