

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : उच्च दाब वीजवाहिनीखाली येणार्या दोन झाडांच्या फांद्या वेड्यावाकड्या छाटण्यात आल्या आहेत. महापालिका उद्यान विभागाची परवानगी न घेता महावितरणकडून हा कारभार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
चिंचवड-वाल्हेकरवाडी रस्त्यावर जुन्या जकात नाक्याजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला खासगी मोकळ्या जागेतील दोन झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याचे आढळले आहे. महावितरणच्या उच्च दाब वीजवाहिनीत अडथळा ठरत असल्याने फांद्या तोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
महापालिका उद्यान सहाय्यक (ब प्रभाग) प्रदीप गजरमल म्हणाले, उच्च दाब वीजवाहिनी जात असल्याने महावितरणकडून 2 झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी उद्यान विभागाची रीतसर परवानगी घेतली नव्हती. परवानगी घेऊनच यापुढे कार्यवाही करण्याच्या सूचना महावितरणच्या बिजलीनगर कार्यालयाला लेखी पत्राद्वारे देण्यात येणार आहे.
खासगी भूखंडात साचतोय कचरा
येथील खासगी भूखंडामध्ये नागरिक कचरा टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. या कचर्यामध्ये प्लास्टिक कचर्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे, येथे असलेली काही झाडे देखील उन्मळून पडलेली असल्याचे दैनिक मपुढारीफच्या प्रतिनिधीने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे.
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी छाटणी : महावितरणचे स्पष्टीकरण
सुरळीत वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी देखभाल-दुरुस्तीच्या कामात वीजतारांवर येणार्या छोट्या फांद्यांची छाटणी केली जाते. यामध्ये मोठ्या फांद्या किंवा झाडांचा अडथळा येत असल्यास त्यासंबंधी उद्यान विभागाला कळवून त्यांच्याकडून पुढील कार्यवाही करण्यात येते. या प्रकरणात छोट्या फांद्यांची छाटणी करण्यात आली असेल. तथापि, याविषयी माहिती घेण्यात येईल, असे महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्याकडून सांगण्यात आले
चिंचवड-वाल्हेकरवाडी रस्त्याच्या बाजूला चिंचवड येथे असलेल्या मोकळ्या जागेतील झाडे तोडण्यात येत आहेत. तसेच, येथे नागरिक कचरा आणून टाकत आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून येथे स्वच्छता झालेली नाही. फळ, भाजी विक्रेते जर येथे कचरा टाकत असतील तर त्यांना कचरा टाकण्यासाठी महापालिकेने व्यवस्था करावी.
– मिताली श्रोत्रिय, नागरिकचिंचवडला जेथे झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत तेथे प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्यास पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात येईल.
– गोरख गोसावी, उद्यान अधीक्षक, महापालिका.