पुणे : 5000 अतिजोखमीच्या गर्भवतींवर शहरात उपचार

पुणे : 5000 अतिजोखमीच्या गर्भवतींवर शहरात उपचार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेतर्फे 'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याअंतर्गत निदान झालेल्या अतिजोखमीच्या 5000 गर्भवतींवर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. राज्य शासनाने सुरू केलेल्या अभियानांतर्गत 18 ते 30 वर्षे वयोगट, 30 वर्षे वयावरील महिला, गर्भवती महिला, स्तनदा माता यांच्या तपासणीला प्राधान्य देण्यात आले. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, अ‍ॅनिमिया, कर्करोग, हृदयविकार, मानसिक आरोग्य अशा विविध आजारांच्या तपासण्यांवर भर देण्यात आला. तपासण्यांच्या निदानामधून उपचारांची दिशा ठरवण्यात आली आहे. त्यानुसार उपचार दिले जात आहेत.

तपासणीदरम्यान 853 महिलांना तीव्र रक्तक्षय, 2641 जणींवर गर्भावस्थेदरम्यान उच्च रक्तदाब, 502 महिलांवरील गर्भावस्थेदरम्यानचा मधुमेह, 734 जणींवर हायपोथायरॉईड, 394 जणींवर हायपरथायरॉईडचे उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पुणे महापालिकेअंतर्गत 454 महिलांवर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, तर 117 जणींवर छोट्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एकूण 571 महिलांनी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रियांचा लाभ घेतला आहे.

अभियानांतर्गत आजारांचे निदान झालेले रुग्ण विविध आरोग्य संस्थांमध्ये उपचारांचा लाभ घेत आहेत. डॉक्टरांकडून त्यांना औषधोपचार, उपचारांची दिशा याबद्दल मार्गदर्शन केले जात आहे.
                 – डॉ. मधुकर दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news