5 पाच हजार द्या, उतारा घ्या; लाच घेताना ग्रामसेवकाला पकडले

5 पाच हजार द्या, उतारा घ्या; लाच घेताना ग्रामसेवकाला पकडले
Published on
Updated on

पुणेः पुढारी वृत्तसेवा : वरसगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला पाच हजारांची लाच घेताना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विठ्ठल वामन घाडगे (वय 44) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. वडिलोपार्जीत मिळकत घराच्या क्षेत्राच्या नोंदी दुरुस्त करून संगणीकृत आठ अ चा उतारा देण्यासाठी घाडगेने 5 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी, 45 वर्षीय व्यक्तीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घाडगे याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 मार्च रोजी विठ्ठल मंदिर भाजी मंडई कर्वे रोड कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमाच्या भिंतीलगतच्या कॉर्नरवरील एका पानटपरीसमोर ही कारवाई पथकाने केली आहे.

तक्रारदार यांचे वरसगाव, ता. वेल्हे येथे वडिलोपार्जीत मिळकत घर आहे. त्या मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदी दुरुस्त करून आईचे व त्यांचे स्वतःचे नावाचा संगणीकृत आठ अ चा उतारा हवा होता. हे काम करून देण्यासाठी ग्रामसेवक घाडगे यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. कर्वेगनर परिसरात सापळा लावून पथकाने घाडगे यांना तडजोडीअंती पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news