कासुर्डी येथील जनसेट कंपनीला भीषण आग

खेड शिवापूर(ता. भोर); पुढारी वृत्तसेवा : कासुर्डी येथील जनसेट बनविण्याचे उत्पादन असलेल्या कंपनीला शुक्रवारी (दि. 31) भीषण आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कासुर्डी (ता. भोर) या ठिकाणी अनेक विविध प्रकारच्या कंपन्या आहेत. त्यामधील श्याम ग्लोबल या जनरेटरचे उत्पादन करत असलेल्या कंपनीमध्ये शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान लागली.
जवळपास आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाची टीम बोलाविण्यात आली; मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आकाशात व परिसरात धुरांचे लोट पसरले होते. साधारण अडीच तासानंतर आज नियंत्रणात आली. आगीमध्ये जीवितहानी झाली नाही; मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे; परंतु कंपनी व्यवस्थापन सर्व शहानिशा करून माहिती देणार असल्याचे राजगड पोलिस ठाण्याचे हवालदार सागर गायकवाड यांनी सांगितले.