पुणे : पीएमपी पळतेय ‘ओव्हर ड्राफ्ट’वर

पुणे : पीएमपी पळतेय ‘ओव्हर ड्राफ्ट’वर
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे : महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचलनातील तूट दोन्ही महापालिकांना वर्षात एकदाच दिली जात असल्याने दैनंदिन खर्च भागविण्यासाठी पीएमपीला ओव्हर ड्राफ्ट म्हणजे बँकांची उचल घ्यावी लागत आहे. परिणामी, विविध थकीत बिलांची देणी लांबणीवर टाकण्याची कसरत पीएमपी प्रशासनाला करावी लागत आहे. तसेच, महागाईसह अन्य कारणांमुळे पीएमपीची संचलन तूट दिवसेंदिवस वाढत असून, गेल्यावर्षी 718 कोटी रुपये तूट आली होती, तर यंदा 696 कोटी रुपयांपर्यंत तूट येणार आहे.

दोन वर्षांत वाढली 639 कोटींची संचलन तूट
कोरोना काळात पीएमपीची सेवा ही फक्त नावापुरतीच सुरू होती. त्यामुळे पीएमपीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्या वेळी 2 वर्षांतच पीएमपीला 639 कोटींचा तोटा आला आहे. कोरोनापूर्वी पीएमपीचे वाहतूक उत्पन्न 2019-20 मध्ये 547 कोटी 73 लाख होते. मात्र, 2020-21 मध्ये 164 कोटी 61 लाख आणि 2021-22 मध्ये 291 कोटी 17 लाख रुपये इतके कमी उत्पन्न मिळाले. त्यामुळे कोरोना काळात झालेल्या नुकसानीमुळे पीएमपीला 639 कोटींचे नुकसान झाल्याने संचलन तूट वाढल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

संचलन तूट कमी करण्यासाठीचे उपाय…

  • शहरांतर्गत बसची वारंवारिता वाढविणे
  • खासगी बस आश्वासित कि.मी.पेक्षा जास्त संचलन न देणे
  • मोठ्या प्रमाणावर उत्पन्न व खर्चात तफावत असणार्‍या मार्गांचा फेरविचार करावा
  • 2014 पासून भाडेवाढ झालेली नाही, त्याचाही विचार करावा
  • एमएनजीएल फिलिंग स्टेशन फक्त 5 ठिकाणी आहेत, त्यामुळे डेड किमी जास्त आहे. फिलिंग स्टेशन वाढविल्यास डेड किमी वाढून इंधन खर्चात बचत होईल.
  • महामंडळाच्या ताब्यातील जागा मूळ उद्देशासह विकसन करावी, यामुळे नॉन ट्रॅफीक उत्पन्न वाढेल
  • ग्रामीण मार्गावरील बस कमी कराव्यात

तोटा 15 कोटींवरून 718 कोटींवर…
पीएमपीएमएलची स्थापना झाली तेव्हा 2007 साली पीएमपीचे वार्षिक उत्पन्न 396 कोटी होते. तर खर्च 411 कोटींपर्यंत येत होता. यावरून त्या वेळी पीएमपीला 15 कोटींचा तोटा येत होता. हाच तोटा आताच्या काळात वाढला असून, गेल्या वर्षी 718 कोटींपर्यंत गेला आहे आणि 2022-23 या वर्षांत हाच तोटा 696 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली जात आहे.

2022-23 मधील उलाढाल
उत्पन्न – 590 कोटी रुपये
खर्च – 1162 कोटी रुपये
तोटा – 696 कोटींपर्यंत
दोन्ही मनपांकडून मिळालेली संचलन तूट – 670 कोटी रुपये

संचलन तूट वाढीची कारणे…

2014 नंतर इंधन दर वाढले, पण तिकीटदर वाढले नाहीत
ग्रामीण भागात सुरू
असलेली बससेवा
खासगी ठेकेदारांच्या
बसवरील वाढलेला खर्च
ऑपरेशनल खर्च वाढला
पगार खर्च वाढला
स्पेअरपार्ट व देखभाल
दुरुस्ती खर्च वाढला

पुणेकरांना पीएमपीची बेस्ट सर्व्हिस द्यायची आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. दोन्ही मनपांची आम्हाला मदत मिळत असतेच. पीएमआरडीए आयुक्तसुध्दा आता पीएमपीचे संचालक असणार आहेत. त्यांच्याकडूनही आम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यामुळे आम्ही ताफ्यातील बस गाड्यांची संख्या वाढवणार असून, प्रवाशांना चांगली सेवा पुरविण्यावर भर देणार आहे. – ओमप्रकाश बकोरिया,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news