बारामती: सुप्यात गोळीबार करत सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न

बारामती, पुढारी: बारामती तालुक्यातील सुपे येथील महालक्ष्मी ज्वेलर्स सराफी दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न शुक्रवार ३१ मार्च रोजी सायंकाळी घडला. पाच ते सहा जणांच्या टोळीने हा प्रकार केला. फायरिंग करत दुकान लुटण्याचा डाव होता. या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो फसला. या टोळीतील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य लोक फरार झाले आहेत. सुप्यात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून हा प्रकार करणाऱ्यांच्या शोधार्थ पथके पाठविण्यात आली आहेत.