पुणे : चांगल्या रस्त्याचेच डांबरीकरण ; येरवड्यात गुंजन चौकातील प्रकार | पुढारी

पुणे : चांगल्या रस्त्याचेच डांबरीकरण ; येरवड्यात गुंजन चौकातील प्रकार

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  येरवड्यातील गुंजन चौकापासून सुरू होणारा नगर रस्ता सिमेंटचा बनविण्यात आला होता. मात्र, यातील अर्ध्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे अर्धा रस्ता सिमेंटचा अन् अर्धा रस्ता डांबरी, असे चित्र या ठिकाणी दिसत आहे. यामुळे मार्चअखेर निधी खर्च करण्यासाठी हे काम केले आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगर रस्ता येरवडापासून ते खराडीपर्यंत सिमेंटचा बनविण्यात आला आहे.

यातील एक लेन खराब झाल्यामुळे पथ विभागाने त्याचे डांबरीकरण केले आहे. शास्त्रीनगर चौक ते येरवडा, तसेच शास्त्रीनगर चौक ते चंदननगरपर्यंत हे चित्र पाहायला मिळते. एक लेन मात्र सिमेंटची अद्यापही चांगली आहे. मात्र, त्यावर डांबराचा मुलामा देण्यात आला आहे. केवळ ठेकेदाराने स्वत:च्या फायद्यासाठी हे काम केले नसेल ना ? विकासाच्या नावाखाली महापालिका प्रशासन निधीची उधळपट्टी तर करीत नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. याबाबत चौकशी करून या कामाचे बिल संबंधित ठेकेदाराला अदा करू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हा रस्ता या ठिकाणी वर-खाली होता आणि काही ठिकाणी खराबही झाला होता. त्यामुळे त्याचे डांबरीकरण करण्यात आले. सिमेंट रस्त्यावर नाही, डांबरी रस्त्यावरच हे काम करण्यात आले आहे.

                           -दत्तात्रय तांबारे, शाखा अभियंता, पथ विभाग, महापालिका

Back to top button