पिंपरी : ह्युंदाई कंपनीच्या बनावट स्पेअर पार्टची विक्री | पुढारी

पिंपरी : ह्युंदाई कंपनीच्या बनावट स्पेअर पार्टची विक्री

पिंपरी : ह्युंदाई कंपनीच्या बनावट स्पेअर पार्टच्या विक्रीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 27) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास गणेश साम्रज्य कॉम्प्लेक्स, स्पाईन रोड, भोसरी येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रेवणनाथ विष्णू केकान (40, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी मंगळवारी (दि. 28) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, गणेश तुकाराम गायकवाड (32, रा. शिवनगरी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या दुकानात ह्युंदाई कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विक्रीसाठी ठेवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पंजाब येथील एका कंपनीने भोसरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा नोंदवला. तपास पोलिस उपनिरीक्षक केंद्रे करीत आहेत.

Back to top button