नवी सांगवी : रस्त्यातच बस उभी केल्याने कोंडी | पुढारी

नवी सांगवी : रस्त्यातच बस उभी केल्याने कोंडी

नवी सांगवी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर दुपारी साडे चारच्या सुमारास पीएमपीएल बस चालकाने रस्त्यात बस उभी केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी प्रवाशी बसमध्ये होते. तर बस चालक आणि वाहकशीतपेय पिण्यासाठी खाली उतरले होते.

या वेळी नागरिकांनी वाहन चालकास रस्त्यावर बस उभी करू नये वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यासाठी विनंती केली असता उलट उद्धट उत्तरे देण्यात आली. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास येथील रस्त्यावरच एम एच 12 के क्यू 0686 या नंबरची पीएमपीएल बस उभी करण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. वाहन चालक रस्त्यातच बस उभी केल्याने त्रस्त झाले होते.

आधीच दोन्ही बाजूने वाहने पार्क केल्याने येथील रस्ता अरुंद झाला होता. या वेळी पीएमपीएलचा बस चालक यास रस्त्यात बस उभी करू नका अशी विनवणी येथील नागरिक करीत होते. मात्र वाहनचालक बस चालक उद्धटपणे नागरिकांशी बोलत असल्याचे पहावयास मिळाले. एवढेच नव्हे तर शीतपेय पिण्यासाठी गेलेले चालक व वाहक वाहतूक कोंडी कशी होत आहे, हे चक्क पहात बसलेले छायाचित्रातून दिसून येत आहे.

मी वायसीएम रुग्णालयकडून पिंपळे गुरव दिशेने दुचाकीवरून जात असताना रस्त्यातच बस उभी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मार्ग काढत असताना अक्षरशः नाकीनऊ आले. यावेळी बस ड्रायव्हरला नागरिकांनी बस इथे उभी करू नका असे सांगितले. बस ड्रायव्हरने उद्धट उत्तर दिले. जा तुम्हाला जे काय करायचे ते करा मी नाही हलविणार, असे बोलले. अशांना चांगला धडा शिकवला पाहिजे.

                                                      – पूनम शंकरन, जुनी सांगवी

Back to top button