पुणे : पीएमपीएमएलची तोडफोड करत वाहकास मारहाण | पुढारी

पुणे : पीएमपीएमएलची तोडफोड करत वाहकास मारहाण

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  पीएमपीएमएल बसची तोडफोड करून वाहकाला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी एका कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (दि.28) रात्री पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळील वाकी फाटा येथे ही घटना घडली. अमित सत्यवान हाडवळे (वय 36, रा. जुन्नर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एम.एच. 14 के.एम. 1116) क्रमांकाच्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अमित हाडवळे हे पीएमपीएमएलमध्ये वाहक आहेत. कर्तव्यावर असताना वाकी फाटा येथील बसथांब्यावर त्यांनी बस थांबवली. त्या वेळी आरोपी त्याच्या कारमधून आला. त्याने हाडवळे यांच्यासह बसचालक कदम यांना शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर हाडवळे यांना बेदम मारहाण केली. बसमधील पीएमपीएमएल कर्मचार्‍यांनाही शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिली. बसची तोडफोड करून तिकीट मशिन व मोबाईल फोडला. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button