‘मर्डरचा रिप्लाय मर्डरच !’ म्हणत सराईत गुन्हेगारांकडून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर कोयत्याने वार | पुढारी

'मर्डरचा रिप्लाय मर्डरच !' म्हणत सराईत गुन्हेगारांकडून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर कोयत्याने वार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  2020 साली झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेला परंतु आता जामिनावर बाहेर आलेल्या एकावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. “तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार” असे म्हणून शुभम भोंडे या गुन्हेगारावर भर रस्त्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत.

रिक्षाला दुचाकी आडवी लावून रिक्षातून बाहेर उडत प्राणघातक हल्ला केल्याने एकच खळबळ. घटनेतील आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. याप्रकरणी चौघांच्या विरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तिघे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.

Back to top button