पुणे : भामा आसखेड धरणातून विसर्ग | पुढारी

पुणे : भामा आसखेड धरणातून विसर्ग

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा :  भामा आसखेड धरणातून 1 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग भामा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. या पाण्याचा फायदा खेड, शिरूर, दौंड, हवेली या चार तालुक्यांतील उन्हाळी पिकांसाठी आणि पिण्याच्या पाणी योजनांना होणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. भामा आसखेड धरण 8.14 टीएमसी क्षमतेचे असून, सध्या धरणात 5.14 टीएमसी पाणीसाठा आहे. पाणीपातळी 666.35 दलघमी आहे. एकूण पाणीसाठा 158.92 दलघमी, तर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 145.398 दलघमी आहे.

2022-23 उन्हाळी हंगामाकरिता धरणामधून 1 हजार क्युसेकने पाणी विसर्ग भामा नदीपात्रात सुरू केला आहे. दौंड तालुक्यातील आलेगाव पागापर्यंत भामा-भीमा नदीवरील सर्व बंधारे भरल्यानंतर विसर्ग बंद करण्यात येणार आहे. नदीकाठाच्या शेतकर्‍यांनी खबरदारी घ्यावी, असा इशाराही धरण प्रशासनाने दिला आहे.

Back to top button