पुण्यात कुक होण्यासाठी बाहेरच शिजली खिचडी, चक्क कुकच्या परिक्षेसाठी बसला डमी | पुढारी

पुण्यात कुक होण्यासाठी बाहेरच शिजली खिचडी, चक्क कुकच्या परिक्षेसाठी बसला डमी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: संरक्षण मंत्रालयाच्या एका विभागात कुक (स्वयंपाकी) होण्यासाठी एकाने डमीला परिक्षेस बसविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुक बनन्यासाठी दोघांची अदोगरच खिचडी शिजल्याचेही यानिमित्ताने तपासात समोर आले आहे. दोघांनाही विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. दिपु कुमार (23, रा. बिहार) आणि शैलेंद्र सिंग (24, रा. उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबात राहुल महेंद्रसिंह राठी (42, रा. भैरवनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्रीफ बॉर्डर रोड ऑरगनायझेशन काम करते. या विभागाद्वारे सिमावर्ती भागामध्ये रस्ते बांधणीचे काम चालते. या विभागात नोकरीसाठी स्वयंपाकीच्या (कुकच्या) जागा निघल्या होत्या. त्यासाठी 28 मार्च रोजी धानोरी येथील भैरवनगर येथे या विभागाच्या परिक्षा होणार होत्या. या परिक्षेसाठी शैलैंद्र सिंग या उत्तरप्रदेशच्या परिक्षार्थीने अर्ज दाखल केला होता. परंतु, दिप कुमार याच्याबरोबर परिक्षेपूर्वी झालेल्या ओळखीतून सिंग याने त्याला परिक्षेस डमी बसण्यासाठी गळ घातली. त्यातून दिप कुमार देखील तयार झाला. या दरम्यान हॉल तिकीट घेऊन परिक्षेस बसलेल्या दिपकुमार विषयी पर्यवेक्षक यांना संशय आल्याने त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर दिप कुमार गडबडला. त्यानंतर त्याच्याकडे आणखी विचारणा केल्यानंतर त्याने आपण डमी बसले असल्याचे व मुळ परिक्षार्थी बाहेर थांबल्याचे सांगितले. याबाबत संबंधी विभागाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून दोघांकडेही फसवणुकीच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक रोठोड यांनी सांगितले.

Back to top button