पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं, विरोधी पक्षनेते अजित पवारांसह अनेकांनी वाहिली बापट यांना श्रद्धांजली | पुढारी

पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं, विरोधी पक्षनेते अजित पवारांसह अनेकांनी वाहिली बापट यांना श्रद्धांजली

पुढारी ऑनलाईन: भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची आज प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेकांनी खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. पुणे शहर,जिल्ह्याच्या विकासातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. त्यांची उणीव कायम जाणवेल, असंही पवार यांनी नमूद केलं.

Back to top button