"गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली", पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याकडून शोक व्यक्त | पुढारी

"गिरीश बापट यांनी समाजाची तळमळीने सेवा केली", पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याकडून शोक व्यक्त

पुढारी ऑनलाईन: भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची आज प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीटद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. बापट यांनी “पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील असं ही मोदी म्हणाले. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणार्‍या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. म्हणूनच जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले”, असंही त्यांनी नमूद केलं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. बापट हे शेवटच्या श्वासापर्यंत देश व संघटनेच्या हितासाठी समर्पित राहिले, असं शहा यांनी म्हटलं आहे.

Back to top button