

पुणे, पुढारी वृत्तसेवा: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये आज बुधवार २९ मार्च रोजी सकाळी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले.
आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. त्यानंतर सर्व शेतकरी पुणे- नाशिक महामार्गावर जमले आणि चाकणमध्ये सकाळी साडे अकरानंतर पुणे- नाशिक महामार्ग रोखून धरला आहे. महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा दोन ते तीन किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस आणि बाजार समिती प्रशासन खेड तालुका प्रशासन आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करीत असले तरी आंदोलक अद्यापही रस्त्यात ठाण मांडून आहे