खासदार गिरीश बापट यांचे निधन | पुढारी

खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे : पुढारी डिजिटल:  भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गिरीश बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालवली होती. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले होते.  संघ स्वयंसेवक ते खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती.

Back to top button