पुणे : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे सुसाट | पुढारी

पुणे : ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे सुसाट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी या दोन मार्गावर ‘भारत एक्स्प्रेस ’ दिनांक 11 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाल्या. या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत 1 लाख 259 प्रवाशांनी यामधून प्रवास केला. यातून रेल्वेला 8 कोटी 60 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

असा मिळाला प्रतिसाद

  • मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक-22225) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथील 26 हजार 28 प्रवाशांनी केलेल्या प्रवासामुळे 2 कोटी 7 लाख रुपयांचा महसूल मिळाला.
  • सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस 2 (गाडी क्रमांक-2226) सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील 27 हजार 520 प्रवाशांनी केलेल्या प्रवासामुळे 2 कोटी 23 लाख रुपयांचा महसूल मिळाला.
  • मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक-22223) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि नाशिक रोड येथील 23 हजार 296 प्रवाशांनी केलेल्या प्रवासामुळे 2 कोटी 5 लाख रुपयांचा महसूल मिळाला.
  • साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक-22224 ) : साईनगर शिर्डी आणि नाशिकरोड येथून 23 हजार 415 प्रवाशांनी केलेल्या प्रवासामुळे 2 कोटी 25 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

एका महिन्यात प्रवासी संख्या लाखांवर
तब्बल 8 कोटी 60 लाख रुपयांचा महसूल
मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी दोन्ही गाड्यांना मोठा प्रतिसाद

Back to top button