पुणे : खेड पं. स.च्या बहुचर्चित इमारतीचे भूमिपूजन | पुढारी

पुणे : खेड पं. स.च्या बहुचर्चित इमारतीचे भूमिपूजन

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या तीन-साडेतीन वर्षांत खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कळीचा मुद्दा ठरलेल्या बहुचर्चित खेड पंचायत समितीच्या नियोजित इमारतीच्या कामाचे भूमिपूजन रविवारी (दि. 26) पुन्हा पार पडले. माजी खासदार, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजन प्रसंगी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तब्बल 4 वर्षांपूर्वी माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे आणि माजी खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते.

विधानसभा निवडणूक झाल्यावर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी या कामात बदल घडवून आणला होता. भूमिपूजन झालेल्या जागेवर प्रशासकीय इमारत करण्यासाठी प्रयत्न केले. यावरून त्या वेळी महाआघाडीत एकत्र असलेल्या दोन्ही पक्षांत स्थानिक पातळीवर व वरिष्ठ स्तरावर आरोप-प्रत्यारोप, आंदोलने झाली. यावरून बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, विरोधकांनी सत्तेचा पाशवी दुरुपयोग केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय इमारत टोल नाक्याजवळ व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

पंचायत समितीच्या इमारतीसाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दिवंगत आमदार गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे, जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, ज्योती आरगडे, नितीन गोरे,अरुण गिरे, प्रकाश वाडेकर, अशोक भुजबळ, अपूर्व आढळराव पाटील, मारुती सातकर, केशव आरगडे, विजयसिंह शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

Back to top button