पिंपरी : बांधकाम साईटच्या ऑफिसमधून पाच लाखांची चोरी | पुढारी

पिंपरी : बांधकाम साईटच्या ऑफिसमधून पाच लाखांची चोरी

पिंपरी : बांधकाम साईटवरील ऑफीस बंद असताना चोरट्याने शटर वाकवून दोन लाखांचे प्लंबिंग मटेरियल व तीन लाखांची रोकड चोरुन नेली. ही घटना डुडूळगाव येथील अर्बनिया रिएल्टी कन्स्ट्रक्शन येथे गुरुवार (दि.23) ते शनिवार (दि. 25) दरम्यान घडली.
या प्रकरणी योगेश बबन तळेकर (42, रा. डुडळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचे डुडुळगाव येथे अर्बनिया मंगलम रिएल्टी कन्स्ट्रक्शन नावाने बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु आहे. दोन दिवस सुट्टी असल्याने या कालावधीत ऑफीस बंद होते. याचा गैरफायदा घेत, चोरट्याने ऑफीसचे शटर वाकवून, दोन लाख रुपये किमतीचे प्लंबिंग साहित्य व रोख तीन लाख रूपयांची रोकड चोरून नेली.

Back to top button