पिंपरी : राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाकडून निदर्शने | पुढारी

पिंपरी : राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाकडून निदर्शने

पिंपरी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला असल्याचा मुद्दा उचलून धरत पिंपरी-चिंचवड शहर भाजपाकडून शनिवारी पिंपरी-मोरवाडी येथे निदर्शने करण्यात आली.

या वेळी नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, बाबा त्रिभुवन, राजेंद्र लांडगे, संगीता भोंडवे, अश्विनी चिंचवडे, शर्मिला बाबर, पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मोर्चा संपर्क प्रमुख वीणा सोनवलकर, प्रकाश जवळकर, समीर जावळकर, देंवदत्त लांडे, निखिल काळकुटे, कविता हिंगे, कोमल शिंदे, महादेव कवितके, विजय शिनकर, धनंजय शाळीग्राम, सुभाष सरोदे, फारूक इनामदार, योगेश चिंचवडे, नंदू दाभाडे, माणिक फडतरे, नंदू कदम, विनायक गायकवाड, महेंद्र बाविस्कर, किसन बावकर, संतोष मोरे, मुकेश चुडासमा, देविदास पाटील, गणेश वाळुंजकर, बाळासाहेब भुंबे आदी उपस्थित होते. खाडे म्हणाले की, मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार आहे.

Back to top button