देहूगाव परिसरामध्ये आढळला ‘एच3 एन2’सदृश रुग्ण

देहूगाव परिसरामध्ये आढळला ‘एच3 एन2’सदृश रुग्ण

देहूगाव : परिसरात 'एच 3 एन 2' सदृश रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून परिसराचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एच 3 एन 2 चे रुग्ण आढळून येत आहेत. पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या देहूगावामध्ये शनिवारी एच 3 एन 2 चा सदृश रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या विषाणूचा रुग्ण ज्या भागात आढळून आला आहे.

त्या भागातील घरांचा सर्वे करण्याचे आदेश देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव आणि आरोग्य सहायक प्रवीण सोनवणे यांनी दिले आहेत. डॉ. किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविका या ज्या ठिकाणी एच 3 एन 2 चा रुग्ण आढळून आला आहे. त्या रुग्णाच्या घराजवळील इतर शंभर ते दीडशे घरांचा सर्वे तातडीने करणार आहेत.

देहू परिसरात एच 3 एन 2 चा सदृश रुग्ण आढळून आला असला, तरी त्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

           – डॉ. किशोर यादव, वैद्यकीय अधिकारी, देहू प्राथमिक आरोग्य केंद्र

logo
Pudhari News
pudhari.news